Mumbai: करिनाच्या धाडसाचा गौरव! जीवाची पर्वा न करता ती मदतीला धावली, राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर
Mumbai: करिनाने केलेल्या कामगिरीचं कौतुक होऊ लागलं. याच कामाची दखल घेत तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला.
Mumbai: जिकडे तिकडे भीषण आग..अनेक कुटुंबीय अडकले आगीच्या विळख्यात.. अशात करिना मात्र देवदूतासारखी धावून आली, आणि लोकांचे प्राण वाचवले. तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. नुकतंच तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते करीना थापाला आज 26 डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. काय घडलं होतं त्या दिवशी?
जीवाची परवा न करता करिना धावली...
मे महिन्यात अमरावतीतील जय अंबा अपार्टमेंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात करिना नावाची युवती जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी धावली, सिलेंडर बाजूला करत तिने कुटुंबीयांसोबतच फ्लॅट मधील इतरांचे सुद्धा जीव वाचवले. त्यामुळे अमरावतीत राहणाऱ्या अंबा अपारमेंटच्या करिना थापाच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतय. नुकतंच तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.
करीनाच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला!
17 मे 2024 रोजी अमरावतीच्या कठोरा परिसरात जय अंबा अपारमेंट मध्ये भीषण आग लागली. अपार्टमेंट मधील दुसऱ्या माळ्यावर ही आग लागली. आगीतून निघणारे धुरांचे लोट, गरम टाइल्स, आणि श्वास गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीचा सामना तिने केला. अवघ्या 17 वर्षाच्या करीनाने प्रसंगावधान राखत सर्वांचा जीव वाचवला. करीनाने केलेल्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. तिने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. या कार्याची दखल सरकारने घेत तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
करिनाच्या कामगिरीचं कौतुक
अमरावतीच्या कठोरा परिसरातील पोतदार इंटरनॅशनल शाळेसमोरील जय अंबा अपारमेंट मध्ये 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान ही घटना घडली होती. याच अंबा अपार्टमेंटमध्ये करीनाचे वडील सुरक्षारक्षकाचा काम करतात. यासोबतच अपारमेंट मधील कामकाज देखील सांभाळतात. करीना अपार्टमेंट मधून खाली येत असताना तिला धूर दिसला. लगेच तिने वडिलांना सांगत त्यांनी फ्लॅट मालकांना सूचना केली. मात्र करीनाने क्षणाचाही विलंब न करता आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. वडील सुरक्षारक्षक असल्याने तिने कुटुंबाप्रमाणे स्वतःची जबाबदारी समजत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग विझल्यानंतर तिने केलेल्या कामगिरीचं कौतुक सुद्धा होऊ लागलं. याच कामाची दखल घेत तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाधिकारी यांनी करीनासह कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलून तिचा सन्मान देखील केला...