एक्स्प्लोर
रखडलेल्या लोकलच्या लगेज डब्यात महिलेची प्रसुती
मुंबई : पहिल्या पावसानंतर सुखावलेल्या मुंबईकरांची लोकलने मात्र दाणादाण उडवली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल विस्कळीत असतानाच, रखडलेल्या लोकलमध्येच एका महिलेची प्रसुती झाली.
मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप स्टेशनजवळ लोकलच्या डब्यात गुडीया प्रमोद गुप्ता यांनी बाळाला जन्म दिला. गुडीया गुप्ता या दिव्याहून सीएसटीला जात होत्या. मात्र आज सकाळपासूनच लोकची दैना उडाली. लोकल रखडली असल्यामुळे गुडीया यांना दवाखान्यात जाता आलं नाही. त्यामुळे लोकलच्या लगेज डब्यात प्रसुत होण्याची वेळ ओढावली.
सध्या या महिलेला सावित्रीबाई प्रसुती गृहात दाखल करण्यात आले आहे.
पारसिक बोगद्याचा भाग कोसळला
दरम्यान, मुंब्रा येथील उदयनगर परिसरातील मध्य रेल्वेच्या जलदगती मार्गावरील बोगद्याच्या वरील डोंगराचा काही भाग ढासळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ठाणे अग्नीशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement