Mumbai Local Mega Block : आज प्रवासाचे नियोजन करताय? मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक या ब्लॉक दरम्यान विस्कळीत असणार आहे
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 30 जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मध्य रेल्वेच्या या मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या
ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 09.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
• 11010 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
• 17611 नांदेड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस
• 12124 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
• 12134 मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 13201 पाटणा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• 17221 काकीनाडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• 12126 पुणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
• 22160 चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
• 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
• 12321 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
• 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
• 11014 कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने सोडण्यात येतील.
• 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -कोल्हापूर एक्सप्रेस
• 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस
• 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस
• 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस
सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस गाड्या अप जलद लाईन आणि डाउन जलद लाईनवर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
• वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
• दिवा येथून सकाळी 11.30 वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी 11.45 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर कुठे असणार मेगाब्लॉक?
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावणार आहेत. मेगाब्लॉकच्या कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असण्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ब्लॉकच्या कालावधीत बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.