एक्स्प्लोर

Megablock : मुंबईकरांनो! रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा

Mega Block on 23 June 2024 : रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, नियोजन करुनच घराबाहेर पडा.

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी 23 जून रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामे करण्यात येणार असून त्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही रविवारी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल, तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, नियोजन करुनच घराबाहेर पडा. 

मध्य रेल्वे मार्ग

सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत

हार्बर रेल्वे मार्ग

सीएसएमटी ते वांद्रे/चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वे मार्ग

माहिम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत

रविवारी मेगाब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल? जाणून घ्या

मध्य रेल्वे

डाऊन धीम्या मार्गावर 

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळेतील धीम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
  • घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावरील
    ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल.

अप धीम्या मार्गावर

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल ही बदलापूर लोकल कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही कल्याण लोकल असून ती कल्याण येथून दुपारी २.३३ वाजता सुटेल. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अप हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत  
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सेवा बंद राहतील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत  सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

हार्बर रेल्वे

डाऊन हार्बर मार्गावर

  • ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकपूर्वीची सकाळी ११.०४ वाजता पनवेलसाठी शेवटची लोकल असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२२ वाजता गोरेगावसाठी  शेवटची लोकल असेल. 
  • ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल.
  • ब्लॉकनंतर वांद्रे पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी ०४.५६ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ०३.२८ वाजता सुटेल. 
  • गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल   सुटेल. 

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
 
ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget