Mega Block : मुंबईकरांनो! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा
Mumbai Local Train Mega Block : रविवारी मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, नियोजन करुनच घराबाहेर पडा.
![Mega Block : मुंबईकरांनो! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा Mumbai Local Train Mega Block on 21 july central harbour western railway megablock timetable indian rail time marathi news Mega Block : मुंबईकरांनो! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, लोकल प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/09/30095140/6-elphinstone-stampede-mumbai-local-train-network-and-its-service.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी 21 जुलै रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामे करण्यात येणार असून त्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही रविवारी घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल, तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, नियोजन करुनच घराबाहेर पडा.
या मेगाब्लॉकसंबंधी लोकल रेल्वे प्रशासनाने एक निवेदन जारी केलं आहे.
मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. २१.७.२०२४ (रविवार) रोजी खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.
सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
डाउन जलद मार्गिकेवर:
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.०३ वाजता सुटेल.
अप जलद मार्गिकेवर:
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल कसारा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी ३.५९ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या/सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
डाउन हार्बर मार्गावर:
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.
गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी ०४.५१ वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर वांद्रे करीता पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ०४.५६ वाजता सुटेल.
अप हार्बर मार्गावर:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ०३.२८ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल.
ब्लॉक कालावधीत कुर्ला- पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)