(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : लोकल प्रवाशांचे हाल; पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं
Mumbai Local News : मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची तारांबळ झाली आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्यानं लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Mumbai Local News : मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांची तारांबळ झाली आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्यानं लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पेंटाग्राफमधील स्पार्कमुळे हार्बर लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. पावसाच्या सरींमुळे शॉर्टसर्किट होत आहे आणि त्यामुळे हार्बर रेल्वेमार्गावरील (Harbour Railway) वीजपुरवठा खंडित होत आहे. म्हणूनच वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज अनेक लोक प्रवास करतात. सकाळी प्रत्येकालाच ऑफिस गाठण्याची घाई होती आणि ऐन कामाला जाण्याच्या वेळी हार्बर रेल्वे ठप्प झाल्यानं अनेक प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, सकाळच्या वेळेत ऑफिस गाठण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे ओव्हरहेड व्हायर्सवरील पेंटाग्राममध्ये स्पार्क झाला आणि वीजपुरवठा खंडीत झाला. त्यानंतर काही काळासाठी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ट्रेन जागच्या जागीच थांबून होत्या. दरम्यान, काही काळानं वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र हार्बरचं संपूर्ण वेळापत्रक कोलमडलं. सकाळी याचा मनस्ताप ऑफिस गाठण्यासाठी धडपडणाऱ्या मुंबईकरांना करावा लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BMC Election 2022 : मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर, राज्य निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी
- BEST : मुंबईकरांचा प्रवास होणार प्रदुषणमुक्त! बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल, 3,675 कोटी रुपयांचा करार
- 1993 Bomb Blast : मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींना सीबीआयने घेतलं ताब्यात, सात दिवसांची कोठडी