(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आज मध्य अन् हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; कसं असेल मुंबई लोकलचं आजचं वेळापत्रक?
Mumbai Local Megablock: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी (CSMT) ते घाटकोपर (Ghatkoper) तर हार्बर मार्गावर (Harbour line) पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार.
Mumbai Local Megablock: मध्य (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbour Railway) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून 14 तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मेगाब्लाक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक आज दुपारी 2 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर असेल. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून मेल- एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील सर्व अप-डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अप ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल येथून ठाण्याला जाणारी लोकल सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे सुटणारी डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल.
पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी मेगालब्लॉक
शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक असणार आहे. तसेच, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.