Mumbai Local : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
रविवार अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त फिरण्याचा किंवा कामानिमित्त रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर मुंबई लोकलचं (Mumbai Local) वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडाल. कारण देखभालीच्या कामासाठी मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. सकाळी साडेअकरा ते दुपारी साडे चारपर्यंत सीएसएमटीहून पनवेलसाठी एकही लोकल सुटणार नाही. मात्र पनवेल ते वाशी, आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल चालवल्या जातील. त्यामुळे रविवारी तुम्ही जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तुमच्या प्रवासाचं नियोजन तुम्हाला आधीच करुन घ्या.
देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य (Central Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या कालावधीत प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल.
मध्य रेल्वेचा असा असेल ब्लॉक...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर असा असेल ब्लॉक..
हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत तसेच वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. तसेच ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ल्या दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.