Mumbai Local MegaBlock : रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, असं आहे वेळापत्रक
Mumbai Local MegaBlock: मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर मार्गावर (Harbor Railway) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार असल्याने मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local MegaBlock: रविवारी म्हणजेच, 18 फेब्रुवारीला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे -कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत तर सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर 11.10 ते 4.40 या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे -कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकापासून पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.