Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega Block : आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडण्याआधी प्रवासाचं नियोजन करा. लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या...
![Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक mumbai local Mega Block train news updates central railway local train mega block today sunday 12 february 2023 Mumbai Mega Block : मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडण्याआधी नियोजन करा, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/483079c262e1810b2a35ade23fae16d71676164238223322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा. 12 फेब्रुवारी रोजी रविवारी देखभालीच्या मध्य रेल्वेकडून (Local Train Mega Block) देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी प्रवासाचं नियोजन नक्की करा.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
विद्याविहार आणि ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक
- पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर-खारकोपर BSU लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
- पनवेल येथून 10.33 ते 15.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
- पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत.
- मेगाब्लॉकच्या कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत. मेगा ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावणार आहेत. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणार्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
- 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस
- 12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्स्प्रेस
- 11080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- 11061 छाप्रा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- 12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
- 12162 आग्रा कॅंटॉंमेंट - लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
- 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्स्प्रेस
- 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस
- 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस
- 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्स्प्रेस
- 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस
- 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस- पटना एक्स्प्रेस
- 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंगळुरू एक्स्प्रेस
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)