एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे-सीएसएमटी लोकलच्या पंख्यात साप, प्रवाशांचा गोंधळ
ठाण्यावरुन सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात फॅनमध्ये साप दिसल्याने, काहीवेळ गोंधळाचं वातावरण होतं.
ठाणे: मुंबईकर चाकरमान्यांना लोकल प्रवासादरम्यान रोज कोणकोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं याची यादी दररोज वाढतीच आहे. पावसाने लोकल अडवणं, ओव्हरहेड वायर तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड ही तर नेहमीचीच कारणं. मात्र आज चक्क एका सापानेच मुंबईकरांची लोकल रोखली.
ठाणे स्टेशनवर चालत्या लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली. ठाण्यावरुन सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात फॅनमध्ये साप दिसल्याने, काहीवेळ गोंधळाचं वातावरण होतं.
या गोंधळामुळे काहीवेळ लोकल थांबवण्यात आली. एक लोकल थांबल्यामुळे मागच्या अनेक लोकल गाड्यांनाही थांबावं लागलं.
ही लोकल टिटवाळ्यावरुन 8.33 वा सीएसएमटीकडे निघाली होती. ही लोकल टिटवाळ्यावरुन ठाण्यापर्यंत आली तोपर्यंत कोणाचंही लक्ष नव्हतं. मग लोकल ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म चारवर आली तेव्हा एका प्रवाशाचं फॅनकडे लक्ष गेलं. त्याने अन्य प्रवाशांचं लक्ष वेधलं असता, एकच आरडाओरडा झाला.
मग एका प्रवाशाने लाकडी पट्टी आणून सापाला फॅनवरुन खाली पाडलं. मग लोकलमधून खाली ट्रॅकवर ढकललं. साप खाली पडल्यानंतर लोकल पुढे रवाना झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement