Mumbai Local : आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप; मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Mumbai Local : मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून करीररोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला आहे.
Mumbai Local : आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं जलद मार्गावरची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस थांबली असून त्यामागे लोकल देखील रखडली आहे.
करीरोड (Curry Road) स्टेशनजवळ हा तांत्रिक बिघाड झाला आहे. सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. सिग्नल न मिळाल्यानं करी रोडवर लोक थांबल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे. सेंट्रल रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
गेल्या अर्ध्या तासांपासून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गेल्या अर्ध्या तासांपासून जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. फास्ट ट्रॅकवरील रेल्वे एकाच जागेवर खोळंबल्या आहेत. तर अप लाईनवरील फास्ट ट्रॅकवरील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलमधील बिघाडामुळे चाकरमान्यांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. मुंबईतील करीरोड रेल्वे स्थानक परिसरात लोकल थांबवली आहे. लोकलच्या आधी एक्सप्रेस बंद पडली होती. रखडलेली एक्स्प्रेस बाजूला काढली आहे. तरीही वाहतूक विलंबानं सुरु आहे.
मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवर लोकल ठप्प झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बराच काळ लोकल ट्रॅकवरच थांबून राहिल्यानं, नागरिकांनी ट्रेनमधून उतरुन स्लो ट्रॅककडे मोर्चा वळवला. रखडलेली एक्सप्रेस बाजूला काढण्यात आली आहे. मात्र तरीही अद्याप वाहतूक विस्कळीतच आहे. अद्या रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशातच लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही.
करी रोड स्थानक हे मुंबईतील इतर रेल्वे स्थानकांपेक्षा लहान रेल्व स्थानक आहे. एक्सप्रेसमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल रेल्वेही खोळंबली आणि रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी जमली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मनस्थापामुळे प्रवासी संतप्त झाले होते. अनेकांनी लोकलमधून उतरुन पर्यायी मार्गानं कार्यालय गाठण्यासाठी धावपळ सुरु केली, तर अनेकांनी स्लो ट्रॅकवर जाऊन पुढच्या लोकलनं प्रवास सुरु केला.