एक्स्प्लोर

कमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस

आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत.

मुंबई : मुंबईतील कमला मिल आग प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. आग प्रकरणातील तिन्ही आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र आरोपी परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. अग्नितांडवात 14 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण? मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं 1 Above पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. ‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’ आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार : मुख्यमंत्री विनापरवाना हॉटेल पाडायलाच हवे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली. कमला मिल परिसरातील अग्नितांडव ही अतिशय दुर्देवी घटना असून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहतांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणे पाच अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिल्सच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी  बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी मधुकर शेलार, पदनिर्देशित अधिकारी धनराज शिंदे, ज्युनिअर इंजिनियर महाले, सब इंजिनिअर पडगिरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी एस. एस. शिंदे, अग्निशमन अधिकारी अपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यू सामाजिक कार्यकर्त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते इलियास इजाज खान यांनी 1 Above हॉटेलची सात महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती. यानंतर आरोग्य विभागाने इथे तपासणी करुन अहवाल सादर केला होता. यामध्ये अवैधपणे हॉटेल बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आरोग्य विभागाचे निरीक्षक पी एम शिर्के यांनी 1Above हॉटेलमालक कृपेश संघवी यांना जुलैमध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये हॉटेलचा अनधिकृत भाग सात दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही हॉटेल अवैधरित्या चालूच होतं.

संबंधित बातम्या

1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान

हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील

कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! 

कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... 

कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली 

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू 

मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Nasim Khan Security : माझ्यावर हल्ला करण्याचा कट, नसीम खान यांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget