एक्स्प्लोर
'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा...' विधानसभेत जयंत पाटलांचे टोले
जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला टोमणे मारले आहेत. 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?' अशी सुरुवात करत 'देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल' असं म्हणत जयंत पाटलांनी सेना-भाजपवर वार केले.
मुंबई : 'सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?' या गाण्याने गेल्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सामान्य तरुणांपासून सेलिब्रेटी आणि आरजे मलिष्कापासून पाकिस्तानी नागरिकांपर्यंत अनेकांच्या तोंडून व्हायरल झालेलं हे गाणं आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही गाजत आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सोनूच्या गाण्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेला टोमणे मारले आहेत. 'सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?' अशी सुरुवात करत 'देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल' असं म्हणत जयंत पाटलांनी सेना-भाजपवर वार केले.
जयंत पाटील यांनी विधानसभेत ऐकवलेलं गाणं :
लाचार सत्तेसाठी झोल झोल - झोल झोल
जनतेचा वाजतोय ढोल ढोल - ढोल ढोल
देवेंद्र वाघाला फिरवतोय - गोल गोल
सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?
सेनेला दिलाय गाजर गाजर
गाजराचा आकार कसा
लांब लांब - लांब लांब
देवेंद्र, तुझ्या कामास म्हणतो
थांब थांब - थांब थांब
सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?
सेनेचा इथे सभेत नखरा नखरा
वाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी)
देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल
सेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय?
देवा, सेनेवर अपमानी घाव खोल खोल - खोल खोल
सत्तेत राहुन त्यांचा शून्य रोल - शून्य रोल
देवेंद्र, कधी तरी खरं बोल - खरं बोल
तुझा सेनेवर भरोसा नाय ना नाय ना?.
सेनेचं भांडं आता खोल खोल - खोल खोल
आता तरी त्यांची साथ सोड - साथ सोड
सत्तेचं नाही काही मोल मोल - मोल मोल
देवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement