एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांच्या शिर्डी दौऱ्याआधीच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, संजय राऊत भडकले; म्हणाले...

Sanjay Raut on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याआधीच शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Sanjay Raut on Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज रविवारी (दि. 05) शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर आले आहेत. मात्र, अमित शाह यांच्या दौऱ्याआधीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख भरत मोरे,मनसेचे तालुकाप्रमुख अनिल गायकवाड यांच्यासह एका सामाजिक कार्यकर्त्याला नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, देशाचे निधड्या छातीचे गृहमंत्री, काश्मीरमधून 370 कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत दोन हात करू पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने फोडून दाखवणारे, सोनम वांगचूकला अटक करणारे, असे अमित शाह नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करतात. त्यांनी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नये, त्या भागातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. आता त्यांना नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात नेऊन बसवण्यात आले आहे. मनसेचे कार्यकर्ते, मराठा समाजातले कार्यकर्त्यांना देखील नोटीस बजविण्यात आली. काहींना अटक करण्यात आली. तुम्हाला ही भीती कसली वाटत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. 

Sanjay Raut on Amit Shah: निषेध करावा तितका थोडा

संजय राऊत पुढे म्हणाले की, तुम्हाला लडाखमध्ये सोनम वांगचूकची भीती वाटते. तुम्हाला मणिपूरमधल्या महिलांची भीती वाटते. तुम्हाला महाराष्ट्रात शिवसैनिकांची भीती वाटते. तुम्ही देशावरती राज्य करत आहात. तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला इतके भय वाटण्याचे कारण काय? शेतकरी अंगावर येतील म्हणून तुम्ही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची कार्यवाही करायला गेले नाहीत ही पण तुमची भीती आहे. या भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का? जे लोकशाहीत आंदोलनाला घाबरतात. लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला आहे. मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा, मंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार दिलेला आहे. याआधीही अशा प्रकारचे आंदोलन झालेले आहेत. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मोरारजी देसाई यांची गाडी अडवली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या गाडीसमोर देखील आंदोलने झालेली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलने झाले आहेत. हे लोकशाहीत होत असतं. पण, हे गुजरात मॉडेल ज्या पद्धतीने राज्य करत आहेत त्यांना लोकांचे आंदोलन नको आहेत. त्यांना लोकांची भीती वाटत आहे. याचा निषेध करावा तितका थोडा आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.  

Sanjay Raut on Amit Shah: हे फार काळ चालणार नाही

तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करत आहात. त्यांनी आंदोलन करण्याची घोषणा देखील केलेली नाही. ते आपापल्या जागेवर काम करत होते आणि त्यांना पोलीस येऊन अटक करून घेऊन जातात.  महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरू आहे? आपण गृहमंत्री असाल पण गृहमंत्र्यांसारखं वागा. हा पळकुटेपणा कशाकरिता आहे? देवेंद्र फडणवीस देखील तसेच वागत आहेत आणि देशाचे गृहमंत्री देखील त्याच पद्धतीने वागत आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, अटक करणे,  तुरुंगात टाकणे यावरच यांचे राज्य सुरू आहे. मात्र, हे फार काळ चालणार नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Bharat Gogawale: रामदास कदमांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंच्या विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले 'कोणाच्या मनात काय ते....'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpri NCP: पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांची आघाडी होणार? की काँग्रेस, शिवसेना बिघाडी करणार?
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
...तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
बिहार निवडणुकीत राजदच्या दारुण पराभवानंतर लालू यादवांच्या कुटुंबात वादळ! बापासाठी किडनी दिलेल्या लेकीचा तडकाफडकी निर्णय
Gold Rate : सोन्याचे दर 3300 रुपयांनी घसरले, चिंता करु नका दरात 20 टक्क्यांची तेजी येण्याची शक्यता, तज्ज्ञ म्हणतात... 
सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येणार, सोने दरात आणखी 20 टक्क्यांची तेजी, तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Embed widget