एक्स्प्लोर

Mumbai Pollution: "रस्त्यावर जाऊन बघा, म्हणजे नियम पाळले जात नसल्याचं तुम्हाला समजेल", मुंबई हायकोर्टाने BMC आयुक्त गगराणींना झापलं

Mumbai Pollution: मुंबईतील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेची खरडपट्टी काढली आहे.

Mumbai Pollution: मुंबईतील ढासळत्या हवेच्या गुणवत्तेवरून (Mumbai Pollution) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पालिकेची खरडपट्टी काढली आहे. आयुक्तांना रस्त्यावर घेऊन जा तेव्हा तुम्हाला समजेल की नियम पाळले जात नाहीत, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला खडेबोल सुनावले आहेत.  मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतल्यावर पालिकेला जाग आल्याची टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे. तर  नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास पालिकेवरच कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 

मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयाने BMC आयुक्तांना खडेबोल सुनावत म्हटले की, "रस्त्यावर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की नियम पाळले जात नाहीत." मुंबईतील विमानतळाच्या परिसरासह काही साइट्सवर नियमांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले असून, जर महापालिकेने वेळेत कारवाई केली नाही तर तिने स्वतःच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे इशारा दिला.

Mumbai Pollution: कामगारांचे आरोग्य आणि मूलभूत अधिकार

उच्च न्यायालयाने बांधकाम स्थळांवरील कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याबाबतच्या नियमांचे पालन न केल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळावरही नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले, "कामगारांना गंभीर आरोग्याचे धोके आहेत, तुम्ही गरीबांचे आरोग्याचे हक्क पाळत नाहीत. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे."

Mumbai Pollution: उच्च न्यायालयाने स्वतः स्थापन केलेली समिती

मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर उपाययोजना करण्यासाठी उच्च न्यायालयाने एक विशेष समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये पर्यावरण तज्ञ, आयआयटीचे तज्ज्ञ आणि निवृत्त प्रधान सचिवांचा समावेश आहे. या समितीमार्फत हवेच्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Mumbai Pollution: उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयाने उद्या पुन्हा सुनावणी घेण्याचे ठरवले असून, BMC आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सुनावणीसाठी तयारी करून उपस्थित राहावे, असे निर्देश दिले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Walmik Karad Santosh Deshmukh Death Case: न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम वाचून दाखवला; वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टात बोलला, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

Nanded : राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण अन् मारहाण; अजितदादांच्या आमदारावर थेट आरोप, सात जणांना अटक

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Solapur Crime: कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
कपड्याला शी लागल्याने संतापला, अकबरने प्रेयसीच्या चिमुकल्या मुलाला गळा दाबून संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Prashant Jagtap: प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
प्रशांत जगतापांच्या राजीनामा अस्त्राकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक
Nagarparishad Election Result 2025 Baramati: पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्राच्या विजयाची जिल्ह्यात चर्चा
Chandrakant Khaire : अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
अंबादास दानवेंनी रशीद मामूंचा पक्षप्रवेश घडवला, स्टेजच्या खाली उतरताच चंद्रकांत खैरे भडकले, अद्वातद्वा बोललो, म्हणाले, 'तुला माझा विरोधच..'
Embed widget