एक्स्प्लोर

Nanded : राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्षनेत्याचं अपहरण अन् मारहाण; अजितदादांच्या आमदारावर थेट आरोप, सात जणांना अटक

Nanded Attack : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरुनच आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी आरोप केला.

नांदेड : एकीकडे महापालिका निवडणुका तोंडावर असताना नांदेडमध्ये मोठी घटना घडली आहे. नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण झाल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले आहेत. अपहरण करून आपल्याला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला. अपहरणकर्त्यांनी आपला संतोष देशमुख करू अशी धमकीही दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. या मारहाणीत घोगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. आपल्याला झालेल्या मारहाणीमागे अजितदादांच्या पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) आणि त्यांच्या सहकार्यांचा हात असल्याचा आरोप घोगरे यांनी केला.

सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जीवन घोगरे हे आपल्या घरातन काम निमित्ताने बाहेर निघाले. हडको येथील पाण्याचा टाकी जवळ त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना दुसऱ्या गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आलं. नंतर त्यांना अज्ञात स्थळी नेऊन जबर मारहाण केली. नंतर मुसलमानवडी जवळ जीवन घोगरे यांना सोडून देण्यात आले.

सात जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे यांनी केला. या मारहाणीमध्ये घोगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत तपासाची चक्र फिरवली.

Pratap Chikhalikar News : प्रताप पाटील चिखलीकरांचा हात, घोगरेंचा आरोप

या प्रकरणी पोलिसांना सात जणांना अटक केली आहे. जीवन घोगरे यांच्या फिर्यादी नुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या हल्लाचे मुख्य सूत्रधार हे लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर हे आहेत असा आरोप जीवन घोगरे यांनी एबीपी माझा सोबत बोलताना केला.

'चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस' अशी धमकी अपहरणकर्त्यांनी आपल्याला दिल्याची माहिती जीवन घोगरे यांनी दिली. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर आरोप करताना जीवन घोगरे म्हणाले की, "माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. सल्या गुंडाला तुम्ही मंत्री करणार का? माझा संतोष देशमुख करून टाकतो अशी सुद्धा धमकी त्यांनी दिली. जमिनी लुटायचे, कबजे करायचे हे यांच धंद आहेत."

अशा गुंडांना मोठं करू नका, नांदेडमधील गुंडाराज बंद करा असं आवाहन जीवन घोगरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त मंगळवारी नांदेडमधील सिडको भाग पूर्ण बंद पाळणार आहे. जीवन घोगरे यांना मारहाण करणाऱ्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे -

शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर ( चालक ), देवानंद भोळे.

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case : सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, माजी खासदार आणि पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget