एक्स्प्लोर

'बेकायदा बांधकामधारकांना मोफत घरं ही महाराष्ट्रातच मिळू शकतात' : हायकोर्ट

पाच वर्षांपूर्वी झोपू योजनेचा अहवाल मागूनही अद्याप सादर न झाल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.10 मार्चपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई : सरकारी आणि वन खात्याच्या जमिनींवर अक्रिमण करून बेकायदा घरं बांधणार्‍यांना सरकारच्या तिजोरीतून मोफत जमीन अथवा घरं ही फक्त महाराष्ट्रातच मिळू शकतात, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेल्या घरांची 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विक्री झालेल्या घरांसंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही नाराजी व्यक्त केली.

तसेच हायकोर्टानं साल 2015 मध्येच झोपू योजनेतील घरांचा सर्वे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले असताना पाच वर्षे उलटली तरी त्या सर्वेच्या अहवाला का सादर करता आला नाही?, असा सवाल विचारत हायकोर्टानं 10 मार्चपर्यंत यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेल्या घरांची 10 वर्षे विक्री करण्यास कायद्यानं मनाई आहे. मात्र असं असतानाही नियम आणि कायदे धाब्यावर बसवून झोपू योजनेतील घरांची सर्रासपणे विक्री केली जाते, असा आरोप करत पाच वर्षापूर्वी जनहित मंचतर्फे भगवानजी रयानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. इथं कोणीही उठतं आणि सरकारी वन जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करत आणि कालांतरानं त्याला सरकारकडून अभय दिलं जाते. इतकंच नव्हे तर पुढे राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेतून त्यांना मोफत घरंही दिली जातात. ही घरं मिळाल्यानंतर ती घरं लगेत विकायला काढली जातात. हा प्रकार म्हणजे बेकायदेशीर गोष्टींना राज्य सरकारकडून दिलेला बोनसच म्हणावा लागेल, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम करणार्‍यांना पुनवर्सन योजनांचा लाभ मिळतो. परंतु खरोखरच जे नियम पाळतात, त्यांना हक्काचा निवाराही मिळत नाही, अशी खंतही यावेळी न्यायालयानं व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Missing Link Mumbai Pune: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याचा तो क्षण पाहणाऱ्या तिघांनी थरार सांगितला, धडाधड मोठे दगड अन् कमान पडली अन्...
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याचा तो क्षण पाहणाऱ्या तिघांनी थरार सांगितला, धडाधड मोठे दगड अन् कमान पडली अन्...
Vinod Tawde and Jayant Patil: शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार? जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
Mumbai News: मुंबईतील पावसात लोकांचा मृत्यू, कोर्टाने सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली, ठाणे महापालिकेला फैलावर घेतलं
मुंबईतील पावसात लोकांचा मृत्यू, कोर्टाने सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली, ठाणे महापालिकेला फैलावर घेतलं
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
Vinod Tawde and Jayant Patil: शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार?; जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा, बैठकीत काय घडलं?
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
Embed widget