एक्स्प्लोर

Mumbai High Court : मुंबई प्रदुषित करणाऱ्या सरकारी प्रकल्पांची आधी पाहणी करा, हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाचे कडक ताशेरे

Mumbai High Court : घसरत्या एक्यूआयवरून मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी पार पडली. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली असल्यामुळे उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई प्रदूषित (Pollution) करणाऱ्या सरकारी प्रकल्पांची आधी पाहणी करा, असं म्हणत हवेच्या गुणवत्तेवरुन उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. प्रकल्प हिताचे असले तरीही पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची पाहणी करा असे निर्देश देखील हायकोर्टाने राज्यसरकारला दिलेत. त्यामुळे पुन्हा एकदा हवेच्या गुणवत्तेवरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. 

घसरत्या एक्यूआयवरून मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान पालिका प्रशासन आणि महाराष्ट्र पोलुशन कन्ट्रोल बोर्डच्या अधिकाऱ्यांनी  नियमित अहवाल तयार करुन तो कोर्टाला सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेत. 

त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा - हायकोर्टाचे आदेश

जे प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. प्रदूषण रोखण्यात कोणताही चालढकल खपवून घेतली जाणार नाही, हयगय करणा-यांनी गंभीर परिणामांना सामोरं जायची तयारी ठेवावी अशा कडक शब्दात राज्य सरकारला खडेबोल सुनावलेत. 

दिवाळीमध्येही मुंबईच्या हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हायकोर्टाने नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार फटाके फोडण्यासाठी केवळ रात्री 8 ते 10 वाजताची वेळ देण्यात आली होती. पण त्यानंतरही हवेची गुणवत्ता काही केल्या सुधारत नव्हती. तसेच आता राज्य सरकारला हायकोर्टाने कडक शब्दात ताकीद दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि महानगरपालिका यावर कोणती कठोर पावलं उचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

दिवाळीपूर्वी मेट्रो आणि इतर बांधकाम आणि त्यानंतर दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा घसरला होता. पण, आता अवकाळी पावसानंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली आला होता. 

दिवाळीत हवेची गुणवत्ता बिघडली

दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली होती. लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) दिवशी 24 तासांत मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पातळी खालावली होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली होती. आता हळूहळू मुंबईतील हवेचा दर्जा सुधारत आहे.

हेही वाचा : 

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : ज्यांनी बीएमसीवर जेसीबी चालवला त्यांना ट्रॅक्टर आणि बीच कॉम्बरमधील फरक काय कळणार? मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget