एक्स्प्लोर
Advertisement
120 कोटीच्या देशात कुणीच सुरक्षित नाही: हायकोर्ट
120 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही, असं म्हणत हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्याकांडाच्या सुनावणीदरम्यान चिंता व्यक्त केली.
मुंबई: 120 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही, असं म्हणत हायकोर्टाने दाभोलकर-पानसरे हत्याकांडाच्या सुनावणीदरम्यान चिंता व्यक्त केली.
‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांड प्रकरणी एसआयटीचा आणि सीबीआयचा सीलबंद तपास अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला.
यावेळी कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित करुन, तपास यंत्रणांना धारेवर धरलं.
फरार आरोपींना विशिष्ठ वर्गाकडून आर्थिक रसद पुरवली जाते. फरार आरोपींना कोण सर्वतोपरी मदत करतंय याचा शोध घेणं गरजेचं आहे, असं हायकोर्टाने नमूद केलं.
सीबीआय आणि एसआयटीने सादर केलेल्या तपास अहवालात, आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पावर हे रेल्वे मार्गाने देशाबाहेर पळाल्याचं म्हटलं आहे. दोघांचे मोबाईल नंबर ट्रेस केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
यावर 120 कोटी लोकसंख्येच्या देशात लपून राहणं अवघड आहे, मात्र अशक्य नाही, असं म्हणत हायकोर्टाने तपास यंत्रणांना सुनावलं.
फरार आरोपींना शोधणं हे एक आव्हान म्हणून स्वीकारा, असा सल्लाही हायकोर्टाने दिला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement