एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी?: हायकोर्ट
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला टक्कर देण्यासाठी या वर्षीपासून सुरु होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत आला आहे.
सायलेसन्स झोनमध्ये लाऊड स्पीकरला बंदी असताना मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी दिली? असा सवाल मुंबई हायकोर्टानं सरकारला विचारला आहे.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध घाला, अशी मागणी वेकॉम ट्रस्टने सोमवारी मुंबई हायकोर्टात केली होती. त्याची दखल घेत कोर्टाने या मागणीसाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.
आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश याआधी न्यायालयानेच दिल्याने वेकॉमच्या मागणीवर मनसेच्या मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश न्यायालयाला द्यावे लागतील. शिवाजी पार्क मैदान निवासी क्षेत्र असल्याने मनसेलाही 55 डेसिबलमध्ये मेळावा साजरा करावा लागेल.
याच मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाने वेळोवेळी आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हाही नोंदवला होता. आता मनसेही यंदाच्या गुढी पाडव्यापासून मेळाव्याची गुढी याच मैदानात उभारणार आहे. न्यायालयाने मनसेला आवाजाचे निर्बंध घातल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचे पालन करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे मैदान शांतता क्षेत्र घोषित करावे, या मागणीसाठी वेकॉमने न्यायालयात याचिका केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने 26 जानेवारी, 1 मे व 6 डिसेंबर हे दिवस वगळून या मैदानावर कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असे आदेश शासन व महापालिकेला दिले. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत होते.
अखेर गेल्यावर्षी राज्य शासनाने शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिल्या जाणाऱ्या यादीत शिवसेनेचा दसरा मेळावा व मनसेचा गुढी पाढवा मेळावा यांचा समावेश केला. परिणामी मनसेला मेळाव्यासाठी न्यायालयात यावे लागले नाही. 2017 मधील पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी पाडवा मेळावा महत्त्वपूर्ण ठरु शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement