एक्स्प्लोर

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं

Mumbai Rain Updates: मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अंधेरी परिसरात तुफान पाऊस, रस्त्यांवर पाणी साचलं. पुढील तीन तास महत्त्वाचे, रेड अलर्ट

Mumbai Rain Updates: गेल्या एका तासापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात अति मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे (Mumbai Rain) अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास (Water Logging) सुरुवात झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Mumbai Rain news)

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. हवामान विभागाने आधीच मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सखल भाग आणि समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई मेट्रोची यलो लाईन पूर्णपणे ठप्प झाली आहे. कांदरपाडा ते आनंदनगर स्थानकादरम्यान ओव्हरहेड केबल तुटल्याने सेवा ठप्प झाली. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. महा मुंबई मेट्रो मार्ग २अ वर दहिसर पूर्व ते कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक कारणास्तव मेट्रो वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

Mumbai School: मुंबईतील शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय 

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज, शनिवार (4 जुलै 2026) रोजी मुंबईतील सर्व महापालिका तसेच संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सकाळच्या सत्रासाठी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, आजही अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज अतिवृष्टी विषयक हवामान खात्याच्या अहवालानुसार नुसार  माननीय आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे आदेशानुसार शाळांना दुपार सत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत आलेले विद्यार्थी सुरक्षित घरी पोहोचतील याबाबत मुख्याध्यापक शिक्षकांनी दक्षता घ्यावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Mumbai Rains: मुंबईत तीन तासांत जोरदार पाऊस

सकाळी 8.30 ते सकाळी 11.30 पर्यंत

पावसाची आकडेवारी 

कुलाबा - 29 मिमी 
सांताक्रुज - 48.2 मिमी

Vasai Virar Rain: वसई-विरारमध्ये अतिवृष्टीचा इशारा, प्रशासकीय यंत्रणा सतर्क

मंत्रालयाकडून आलेल्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात कुठेही पाणी साचल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील नवीन कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे नवीन कॉलेज परिसरातून विरार रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता जलमय झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पायी चालणे तसेच दुचाकी आणि रिक्षाने प्रवास करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक नागरिक आणि रेल्वे प्रवासी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नवीन कॉलेज परिसरातून विरार स्थानकाकडे जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामावर आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या परिस्थितीमुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रशासनाने साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा

Heavy Rain Maharashtra: मोठी बातमी: मुसळधार पावसाने राज्यातील 11 धरणं तुडुंब भरली, हातनूर, गोसेखुर्द धरणांचे दरवाजे उघडले, रायगडमधील 7 धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget