एक्स्प्लोर
Advertisement
मनसेच्या आंदोलनाविरोधात थिएटर मालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
राज्यातील विविध मल्टिप्लेक्स थिएटर कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीविरोधात मालक संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरविरोधात सुरु केलेल्या आंदोलनासंदर्भात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. मारहाणीविरोधात तुमच्याकडे पोलिसांत तक्रार करण्याचा पर्याय आहे. त्याचा या जनहित याचिकेशी संबंध नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे.
पुण्यातील एका मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थ अवाजवी दरात विकल्याबद्दल, तिथल्या कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीविरोधात, मल्टिप्लेक्स मालक संघटनेने सोमवारी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास हाकोर्टाने स्पष्ट नकार दिला.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशाप्रकारे धमकी देणं आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणं चुकीचं असल्याचं संघटनेचं म्हणणं होतं. त्यामुळे जोपर्यंत हायकोर्ट यासंदर्भात अंतिम आदेश देत नाही तोपर्यंत या हिंसक घटना बंद करव्यात असे निर्देश हायकोर्टाने जारी करावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.
न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. हायकोर्टाने दिलेले आदेश स्पष्ट आहेत, त्यात कोणताही बदल करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement