एक्स्प्लोर
हार्बर रेल्वे सुरु, मात्र प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी
पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र थोड्यावेळापूर्वी ही वाहतूक सुरु झाली आहे.
![हार्बर रेल्वे सुरु, मात्र प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी Mumbai Harbour Line Train Traffic Disrupted हार्बर रेल्वे सुरु, मात्र प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/10015948/Harbour-local-railway.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: सकाळी-सकाळीच नवी मुंबईकरांना लोकलने ‘बॅड न्यूज’ दिली. पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र थोड्यावेळापूर्वी ही वाहतूक सुरु झाली आहे.
पण कामाला जाण्याच्या वेळीच लोकलने धोका दिल्याने प्रवासी संतापले आहेत. ठिकठिकाणी प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी वाढत आहे.
काही वेळापूर्वीच रेल्वे रुळाला तडे गेले, त्यामुळे लोकल वाहतूक रखडली होती. त्यानंतर तातडीने दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं.
वाहतूक ठप्प झाल्याने सकाळच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. ऐन कामाला जायच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)