एक्स्प्लोर

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 14 तासांचा पॉवर ब्लॉक; आज मध्यरात्रीपासूनच दुरुस्तीचं काम

Mumbai Local Block Updates: जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

Mumbai Harbour Local Line Updates: मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर (Harbour Line) शनिवारी आणि रविवारी 14 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) आणि गोरेगाव (Goregaon) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर मध्यरात्री 12 ते दुपारी 2 पर्यंत विशेष मेगाब्लॉक (Special Megablock) असणार आहे. जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी (रि-गर्डरिंग) पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे वांद्रे (Bandra) आणि गोरेगावदरम्यान (Goregaon) हार्बर मार्गावरील काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. 

वांद्रे आणि गोरेगाव दरम्यान हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा खालील प्रमाणे असतील

  • शनिवारी रात्री 11.55 ते रविवारी दुपारी 1.55 पर्यंत वांद्रे ते गोरेगाव हार्बर मार्गावरील डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील.
  • शनिवारी रात्री 11.33 ते रविवारी दुपारी 2.05 पर्यंत गोरेगाव ते वांद्रे अप लोकल फेऱ्या रद्द राहतील.

शनिवारी शेवटची लोकल

  • सीएसएमटीपासून गोरेगावसाठी - रात्री 10.54
  • गोरेगावपासून सीएसएमटीसाठी - रात्री 11.06

रविवारी पहिली लोकल

  • गोरेगावपासून सीएसएमटीसाठी - दुपारी 2.33
  • सीएसएमटीपासून गोरेगावसाठी - दुपारी 2.18
  • रेल्वे विभागाने हे पॉवर ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेतले आहेत. 

हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक

डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग वगळून) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.

ब्लॉकमुळे लोकल बदल

  • पश्चिम रेल्वेवरील अप-डाऊन लोकल फेऱ्या अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार.
  • मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या वांद्रे स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार.
  • चर्चगेट-बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अंधेरी स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार. अंधेरी रेल्वे स्थानकातूनच चर्चगेट-बोरिवली दरम्यान लोकल रवाना होतील.
  • चर्चगेट ते विरार दरम्यान अतिरिक्त लोकल चालवण्यात येणार.
  • ब्लॉक वेळेत मेल-एक्स्प्रेस 15 मिनिटे विलंबाने धावणार.

हेही वाचा:

Mumbai Local: मुंबई महापालिका निवडणुकीआधी रेल्वेकडून मोठी घोषणा, मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 238 एसी लोकल  येणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget