एक्स्प्लोर

गोरेगावात अग्नितांडव,आठ जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना PM मोदींनीही जाहीर केली मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरेगावमधील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन  लाख  तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुंबई: गोरेगावमधील इमारतीच्या (Mumbai Goregaon Fire News)  पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून 58 जण जखमी झाले आहेत. जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरेगावमधील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन  लाख  तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींकडून मुंबईतील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या संदर्भात ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले,  गोरेगाव दुर्घटनेतील जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे.  जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी  प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती  मदत प्रशासन करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह  मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50  हजार  रुपये दिले जातील.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,   ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आगीच्या या घटनेची  मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.  या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक

जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. दरम्यान आग लागलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत. 

हे ही वाचा:

Goregaon Fire: गोरेगावात आठ जणांचा मृत्यू आगीमुळे होरपळून नाही, मुंबई मनपा आयुक्तांचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09  PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRashmi Thackeray CM Banner : मविआची सत्ता आल्यास रश्मी ठाकरे मुख्यमंत्री? मातोश्रीच्या अंगणात बॅनरABP Majha Headlines : 08 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 PM : 22 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Embed widget