एक्स्प्लोर

Goregaon Fire: गोरेगावात आठ जणांचा मृत्यू आगीमुळे होरपळून नाही, मुंबई मनपा आयुक्तांचा दावा

मुंबईच्या गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये (Goregaon Fire) लागलेल्या आग दुर्घटनेती चौकशी सात  दिवसांच्या आत पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे

मुंबई:  गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या (Goregaon Fire) पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून आगीमुळे एकाचाही मृत्यू  झालेला नाही, असा दावा  मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल यांनी केला आहे. सगळे मृत्यू हे  सगळे मृत्यू गुदमरल्यामुळे झालेत.  धुरात गुदमरून लोकांचा मृत्यू झाला आहे, असे इक्बालसिंह चहल म्हणाले. 

मुंबईच्या गोरेगावमधील जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आग दुर्घटनेती चौकशी सात  दिवसांच्या आत पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे. पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागलीअसल्याचा प्राथमिक अंदाज फायर ब्रिगेडकडून व्यक्त करण्यात आला आहे. पार्किंगमध्ये ठेवलेल्या  कपड्यांच्या गाठोड्याला आग लागल्यानं आग जास्त पसरत गेल्याचे इकबाल सिंह चहल म्हणाले

बीएमसीकडून चौकशी होणार 

गोरेगावमधील जय भवानी इमारत ही एसआरएची होती. मग  एसआरए इमारतीची मॅनेजमेंट कमिटी कार्यरत होती का? आग विरोधी यंत्रणा कार्यरत होती का?  फायर एक्झिटमधून रहिवासी जलद गतीनं बाहेर का पडू शकले नाहीत?. पार्किंगमध्ये कपड्यांच्या गाठोडे ठेवण्याची परवानगी कुणी दिली?  बीएमसीकडून सदर इमारतीचे फायर ऑडीट कधी झाले होते?  याची देखील चौकशी बीएमसीकडून होणार असल्याची माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. 

मृतांमधे बहुतांश कचरावेचक नागरिक 

आतापर्यंत या आगीत लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत्यू गुदमरल्यामुळे झाले आहेत. मृतांमधे बहुतांश कचरावेचक नागरिक आहे.  कारण इमारतीत जास्तीत जास्त  लोक कचरावेचक होते. त्यांनी गोळा केलेला कचरा खाली रचून ठेवला होता. ज्यामुळे आग जास्त भडकली. इमारतीतील फायर सेफ्टीच्या गोष्टींची तपासणीही केली जाईल. प्लास्टिक सर्जरीसाठी चार रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात येत आहे. त्यात दोन मुले, दोन नागरिकांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकार चार लाख रुपयांची भरपाई देणार आहे. धुरात गुदमरून लोकांचा मृत्यू झाला आहे. 

जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. दरम्यान आग लागलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

Goregaon Fire: गोरेगावात भीषण अग्नितांडव, आठ जणांचा मृत्यू, 58 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget