Raj Thackeray: 2011 पासून सुरु असेलेल्या मुंबई गोवा महामार्ग राज ठाकरेंना आताच का महत्वाचा ?
Mumbai Goa National Highway: नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.
Mumbai Goa National Highway: नुकतच समृद्धी महामार्गाचा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यात मात्र गेल्या सोळा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करत, काम कधी पूर्ण होणार? असा सवाल उपस्थित करत, हा पूर्ण व्हावा अशी मागणी केलीय. मात्र राज ठाकरे यांनी आत्ताच ही मागणी करण्याचे कारण काय? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पाहूया त्यावरचा विशेष रिपोर्ट.
राजकारणाची दिशा विकासाकडे वळविण्याचा प्रयत्न समृद्धीच्या माध्यमातून झाला. त्याचवेळी कोकणातील अविकासाचीही चर्चा होऊ लागली आहे. एकीकडे सुस्साट जाणारा समृद्धी महामार्ग आणि दुसरीकडे ठेचकाळत, हेलकावत जाणार्या वाहतुकीची रखडपट्टी करणारा, कोकणाचे भाग्य बदलणारा मुंबई -गोवा महामार्ग याची तुलना होऊ लागली. मात्र बारा वर्षांपूर्वी 2011 मध्ये मुंबई -गोवा महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र अजूनही याला महामार्ग म्हणावे अशी स्थिती नाही, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा आता लावून धरला आहे.
मुंबईला कोकणाशी जोडणारा, कोकणाच्या शेतीत, उद्योगात समृद्धी आणणारा हा महामार्ग आहे. मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने कोकण वासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गेल्या अनेक वर्षांपासून राहतात, मात्र एक रस्ता माय भूमीत जायला राज्यकर्ते इतक्या वर्षात करू शकले नाहीत याची खंत ते व्यक्त करतात अन् त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा मुद्दा हाती घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून वाईला हवी तशी प्रगती आणि विकास झाला नाही. हीच बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरोबर हेरली. कारण नुकतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विशेष कोकण दौरा केला आणि त्या ठिकाणचे प्रश्न आणि समस्या या जाणून घेतल्या. मुंबई महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यातच पार पडतील. मुंबईत कोकण वासियांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यात सर्वच पक्ष मुंबईतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न करतायत. मनसेचा मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा, हा कोकणातील चकरमण्यांची मतं मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता या नवीन वर्षात आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि कोकणातील आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कोकणात दोन सभा घेणार आहेत. या सभांमधून राज ठाकरे कोकण वासियांना काय सांगतात आणि कोकण वासियांची मन कशाप्रकारे जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षानुवर्षे कोकणाचा विकास न करणारे, साधा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करू शकणाऱ्यांना आजपर्यंत कोकणी माणसांनी निवडून दिलं.पण आता त्यांना नाकारून एक नवा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने उभा राहत आहे असा विश्वास राज ठाकरे यांनी कोकण दोऱ्यावर असताना कोकणवासीयांना दिला. त्यामुळे जर महामार्गाच्या कामाला वेग आला तर मनसे याच क्रेडिट आगामी काळात करुन घेईल असं दिसत आहे.