एक्स्प्लोर

Mumbai : कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून ट्विटरचा प्रभावी वापर, 'असा' केला आव्हानांचा सामना

ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांशी सहज संवाद साधणे सोपे गेले. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेला ट्विटरच्या कसा फायदा झाला याविषयी  मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी माहिती दिली आहे.  

मुंबई : कोरोना काळात (Coronavirus)  सोशल मीडिया (Social Media) हे संवादाचे प्रभावी सधान बनले.  सोशल मीडिया कोरोना काळात वरदान ठरले.  कोरोना काळात वैद्यकीय यंत्रणेवर येणारा प्रचंड ताण, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड तसेच औषधांची मोठ्या प्रमाणावर गरज पूर्ण करण्यात सोशल मीडियाचा मोठा हातभार लावला आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता सोशल मीडियाने योगदान महत्त्वपूर्ण आहे. ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला मुंबईकरांशी सहज संवाद साधणे सोपे गेले. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेला ट्विटरच्या कसा फायदा झाला याविषयी  मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी माहिती दिली आहे.  

कोरोना महामारीच्या काळात प्रभावी प्रशासन चालविण्यासाठी ट्विटरने बीएमसीला कशी मदत केली?

लोकांशी तसेच वेगवेगळ्या कार्यालयांसोबत ताज्या अपडेट्सनी जोडण्यात ट्विटरचा वापर चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने झाला. लोकांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यामध्ये ट्विटरचा उपयोग झाला. रुग्णालयातील कोरोना बेड्स, लसींची माहिती, कोरोना काळात घ्यावयाची काळजी, प्रोटोकॉल्स याचसोबत कोरोनाच्या रोजच्या रुग्णांची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात येत होती. इतर माध्यमांची तुलना करता ट्विटर अधिक उपयोगी ठरलं.

BMC ने 2019 मध्येच ट्विटरचा सक्रियपणे वापर करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी सुशासन आणि नागरिकांच्या कल्याणाचा प्रश्न येत होता त्यावेळी त्याचा उपयोग कसा झाला?

लोकांशी जोडण्याचा हा एक मल्टिप्लॅटफॉर्म होता आणि याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आला. याचा वापर त्या आधीही करण्यात येत होता, पण लोकांना समोरं जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज होणं महत्त्वाचं समजत होतो. आमच्या क्षमतेनुसार सोशल मीडियाद्वारे नागरिकांची सेवा करण्यास सक्षम असण्याची खात्री बाळगली पाहिजे.  आमचा विश्वास आहे की, या प्लॅटफॉर्मवर सक्रिय होण्यापूर्वी घालवलेला वेळ आणि विचार यामुळे त्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. तेव्हापासून ते अखंडपणे कार्यरत आहे.

सोशल मीडियाच्या काळात शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये कसा बदल झाला आहे?

शासन निश्चितच बदललं आहे आणि हा बदल सकारात्मक आहे. आमच्या कामासाठी यामुळे जागतिक दृष्टिकोन प्राप्त झाला. लोकांशी यामुळे कनेक्ट राहता आलं आणि लोकांमध्ये शासनाला आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या काम करताना कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागतं याबद्दल जागरूकता निर्माण करता आली. यामुळे सेवा प्रदान करताना ती सुलभ होऊ शकली आणि अधिक उत्तरदायित्व होऊ शकली.

@mybmc च्या ट्विटर हँडलशिवाय, संपूर्ण शहरात प्रशासकीय प्रभागांची 24 खाती आहेत. नागरी समस्या वेळेवर सोडवल्या जाव्यात आणि काम अधिक प्रभावी व्हावं यासाठी यासाठी BMC काय करत आहे?

 24 कर्मचाऱ्यांना 24 वॉर्डांच्या हँडलसाठी नियुक्त करण्यात आलं आहे. या सर्वावर एक नोडल अधिकारी थेट देखरेख करतो. त्यांच्या संबंधित हँडलवर प्राप्त झालेल्या सर्व समस्या संबंधित जबाबदार अधिकार्‍यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे ही त्यांची जबाबदारी आहे. सर्व गोष्टीना संबंधित अधिकार्‍यांनी मान्यता दिली आहे आणि हँडलचे शेड्यूलनुसार दररोज परीक्षण केले जाते आणि डेटा रेकॉर्ड केला जातो. सर्व शंकांचे समाधान होईल याकडे लक्ष दिलं जातं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन चालवताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला?

काहीवेळा सोशल मीडियाद्वारे मिळालेली माहिती अपूर्ण असते आणि त्यावर अधिकची माहिती मिळवणे आवश्यक असते. असं असलं तरी सोशल मीडियाचा टू वे कम्युनिकेशनचे माध्यम म्हणून वापर करता येतो. त्यातून follow अप घेता येतो आणि अधिक स्पष्टता मिळते. यातील आणखी एक आव्हान म्हणजे आम्हाला प्राप्त होणाऱ्या प्रश्नांची संख्या आणि नागरी समस्यांची विविधता. परंतु ट्विटर हँडलच्या विकेंद्रीकरणामुळे नागरिक आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यास मदत झाली आहे.

Twitter ची BMC सोबत कशा पद्धतीची भागीदारी?

या प्रश्नाचे उत्तर देताना ट्विटर इंडियाच्या पायल कामत म्हणाल्या की, नागरिकांना एकमेकांशी, प्रशासनाशी आणि त्यांनी निवडलेल्यांशी लोकप्रतिनिधीशी जोडले जाण्यासाठी योग्य तो सुसंवाद प्रस्थापित करण हे आमचं ध्येय आहे. प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिनिधींशी थेट संपर्क, संवाद साधण्यासाठी आम्ही एक मार्ग उपलब्ध करून देतो. त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढीस लागण्यास मदत होते.

कोरोनाशी संबंधित अफवावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्विटरचे  काय धोरण होते?

याबाबत बोलताना पायल कामत म्हणाल्या, आम्हाला माहित आहे की, अशा प्रकारच्या संकटाच्या वेळी अफवा आणि चुकीची माहितीमुळे लोकांचे वैयक्तिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. जागतिक लसीकरण सुरू असताना आम्ही आमचे नियम आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी यांचा ताळमेळ घालण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही तंत्रज्ञान आणि मानवी पुनरावलोकनाच्या वापराने Twitter वर असलेल्या सामग्रीचे बदलते स्वरूप पाहता अपप्रचार करणारी माहिती,संभाव्य हानिकारक आणि दिशाभूल करणारी माहिती हटवण्यास प्राधान्य देत आहोत. याच धोरणानुसार  कोरोनाशी संबंधित  चुकीची माहिती काढून टाकली जाईल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget