रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली
यामुळे या पुलाखाली जास्त वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जर यावेळी सिग्नल लागलेला नसता आणि वाहनांची पुलाखालून वाहतूक सुरु असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक 34 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतक महिला जीटी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे.
घटनेतील मृतांची नावं 1. अपुर्वा प्रभू 35 वर्ष 2. रंजना तांबे 40 वर्ष 3. जाहीद शिराज खान 32 वर्ष 4. भक्ती शिंदे 40 वर्ष 5. तपेंद्र सिंह 35 वर्ष
घटनेतील जखमींची नावं 1. सोनाली नवले 30 वर्ष 2. अध्वित नवले 3 वर्ष 3. राजेंद्र नवले 33 वर्ष 4. राजेश लोखंडे 39 वर्ष 5. तुकाराम येडगे 31 वर्ष 6. जयेश अवलानी 46 वर्ष 7. मोहन कायगडे 40 वर्ष 8. महेश शेरे 9. अजय पंडित 31 वर्ष 10. हर्षदा वाघाळे 35 वर्ष 11. विजय भागवत 42 वर्ष 12. निलेश पाटावकर 13. परशुराम पवार 14. मुंबलिक जैसवाल 15. मोहन मोझाडा 43 वर्ष 16. आयुषी रांका 30 वर्ष 17. सिराज खान 18. राम कुपरेजा 59 वर्ष 19. राजेदास दास 23 वर्ष 20. सुनील गिर्लोटकर 39 वर्ष 21. अनिकेत अनिल जाधव 19 वर्ष 22. अभिजीत माना 31 वर्ष 23. राजकुमार चावला 49 वर्ष 24. सुभेष बॅनर्जी 37 वर्ष 25. रवी लगेशेट्टी 40 वर्ष 26. नंदा विठ्ठल कदम 56 वर्ष 27. राकेश मिश्रा 40 वर्ष 28. अत्तार खान 45 वर्ष 29. सुजय माझी 28 वर्ष 30. कानुभाई सोलंखी 47 वर्ष 31. दीपक पारेक 32. अनोळखीया पुलाचा जवळपास 60 टक्के स्लॅब रहदारीच्या रस्त्यावर कोसळल्याने एकच हाहाकार उडाला.
मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळला https://t.co/XTEZsP3Ftd
— ABP माझा (@abpmajhatv) March 14, 2019
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून पुलाच्या स्लॅबचा सांगाडा हटविण्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा पुलाचा स्लॅब कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या वेळेला खूप गर्दी असल्याने अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.
Foot over bridge connecting CST platform 1 north end with B T Lane near Times of India building has collapsed. Injured persons are being shifted to hospitals. Traffic affected. Commuters to use alternate routes. Senior officers are on spot.
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 14, 2019
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
या घटनेत 34 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनास्थळी सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या सुदुंबरे येथून एनडीआरएफची टीम मुंबईकडे रवाना झाली आहे. सीएसएमटी स्टेशनवर पुलाचा स्लॅब कोसळलेल्या घटनास्थळी पुढील काही वेळात पोहचेल अशी माहिती आहे.टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेला हा पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. या पुलाचा कामा रूग्णालयानजीकचा भाग कोसळला आहे. या पुलावर असलेला क्राँक्रिट स्लॅब पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे. सध्या घटनास्थळावरून गर्दी हटवणं हे सध्याचं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पुलाचा सांगाडा कोसळण्याची भीती असल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी तेथील गर्दी कमी करण्याचे काम सुरू आहे. ही गर्दी CST स्थानकाकडे हलवण्यात येत आहे.
दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या
पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका
पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप
'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे
रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली