एक्स्प्लोर
क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी बिल्डरला अटक
परळमधील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आग प्रकरणी बिल्डर अब्दुल रझाक सुपारीवाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : परळमधील 17 मजली क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आग प्रकरणी बिल्डर अब्दुल रझाक सुपारीवाला याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विनोद दत्ताराम मयेकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अग्निशमन यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचा आरोप क्रिस्टल टॉवरच्या बिल्डर अब्दुल रझाकवर ठेवण्यात आला आहे. बिल्डरविरोधात आयपीसी कलम 304, 336,337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत चार नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. दोन पुरुषांचा लिफ्टमध्ये अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. तर एका वृद्ध महिला आणि पुरुष यांनी आगीत जीव गमावला. तसंच 16 जणांवर केईएममध्ये उपचार सुरु आहेत.
लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू
आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करु नये, असं अग्निशमन दलातर्फे वारंवार बजावलं जातं. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करत दोघांनी लिफ्टमधून खाली येण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर संजीव नायर आणि अशोक संपत हे नागरिकांना वाचवण्यासाठी गेले होते. काही लोकांना त्यांनी वाचवलंही. पण परत येताना त्यांनी लिफ्टचा वापर केला. परंतु त्यांचा लिफ्टमध्येच गुदमरुन करुण अंत झाला. तर बबलू शेख (वय 36 वर्ष) आणि शुभदा शेळके (वय 62 वर्ष) यांचाही श्वास गुदमरुन मृत्यू झाला.
शॉर्ट सर्किटमुळे आग
दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून कूलिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. तसंच परिसरातही धूर कायम आहे.
इमारतीला ओसी नव्हती : स्थानिकांचा आरोप
आगीत इमारतीच्या वरच्या मजल्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र पाच वर्षापूर्वी बांधलेल्या या इमारतीला ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालं नव्हतं, तसंच बिल्डरने अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केला आहे.
संबधित बातम्या
परळ आग : क्रिस्टल टॉवरला ओसी नव्हती, स्थानिकांचा आरोप
परळ आग : धुरातून बाहेर पडण्यासाठी चिमुरडीचं ट्रेनिंग
परेलच्या क्रिस्टल टॉवरमधील आगीत चौघांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement