(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News : मुंबईत मोठी कारवाई! तीन कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह महिलेला अटक
मुंबईत एक मोठी कारवाई अँटी नार्कोटिक्स सेलनं केली आहे. तीन कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह एका 50 वर्षीय महिलेला अटक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं मुंबईतील हाय प्रोफाईल परिसर म्हणजे साऊथ मुंबईत ही कारवाई केली आहे.
मुंबई : मुंबईत एक मोठी कारवाई (Mumbai Crime News) अॅंटी नार्कोटिक्स (Anti Narcotics) सेलनं केली आहे. तीन कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह एका 50 वर्षीय महिलेला अटक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं मुंबईतील हाय प्रोफाईल परिसर म्हणजे साऊथ मुंबईत ही कारवाई केली आहे. साऊथ मुंबईत (South Mumbai) सदर महिला हाय क्वालिटीचं ड्रग्ज सप्लाय (drugs Case) करायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Mumbai | Worli unit of Anti Narcotics Cell arrested a 50-year-old female drug peddler from the Kandivali area. 1.27 kg of heroin worth Rs 3.8 crore was seized from the lady. Case has been registered under Narcotic Drugs and Psychotropic Substances Act. Investigation is underway pic.twitter.com/lhPf8f97Nz
— ANI (@ANI) June 4, 2021
डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितलं की, त्यांच्या वरळी युनिटला माहिती मिळाली होती की, एक महिला ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम साऊथ मुंबईमध्ये करत आहे. कालबादेवी परिसरात ही महिला ड्रग्ज डिलिव्हरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली.
ही माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण आणि त्यांच्या टीमनं सापळा रचला. यावेळी त्यांनी एका महिलेला अटक केलं. तिची चौकशी करुन झाडाझडती घेतली असता तिच्याकडे जवळपास 1 किलो 27 ग्रॅम हेरॉइन मिळालं. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 3 कोटी 8 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.
Drug Case : सुशांत सिंह राजपूतचे नोकर नीरज आणि केशवला NCB कडून समन, चौकशीसाठी बोलावले
पोलिसांनी त्या महिलेवर एनडीपीएस कलम 8 (क) आणि 28 (क) अंतर्गत गुन्हा नोंद कर अटक केली आहे. या महिलेचं नाव सरस्वती परमा नायडू आहे. ही मोठी सप्लायर असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी सरस्वती नायडूला कोर्टात हजर केलं. किल्ला कोर्टानं तिला 8 जून पर्यंत अँन्टी नार्कोटिक्स सेलच्या कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Drugs Case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून सिद्धार्थ पीठानीला अटक