एक्स्प्लोर
मंजुळा कारागृहात चक्कर येऊन कोसळली, पोलिसांचा कोर्टात दावा
मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, त्यामुळे तिच्या शरीरावर खुणा असल्याचा अजब दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात केला आहे.
मुंबई : मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, त्यामुळे तिच्या शरीरावर खुणा असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केल्यावर हायकोर्टाने पोलिसांना झापलं आहे.
भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणी प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीच्या वेळी 'बाथरुममध्ये घसरुन पडल्यामुळे मंजुळाच्या अंगावर खुणा होत्या' असा अजब दावा पोलिसांनी हायकोर्टात केला.
यावर 'इतर प्रकरणातही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का?' असा थेट सवाल हायकोर्टाने क्राईम ब्रांचला विचारला.
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करुन तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.संबंधित बातम्या
देशभरातील महिला खासदारांची भायखळा 'जेल भेट'
मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार
मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप
महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement