मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार, 'या' भागात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट
Mumbai Coronavirus Update : मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार पोहोचली असून गोरेगाव भागांत सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे.
![मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार, 'या' भागात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट Mumbai Coronavirus Update Mumbaikars afraid of Corona fourth wave number of patients is more than 700 Goregaon has highest positivity rate मुंबईकरांना चौथ्या लाटेची भीती? दैनंदिन रुग्णसंख्या 700 पार, 'या' भागात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/08/add0a03a3988b66d2e0d91ca616409c2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Coronavirus Update : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं (Mumbai Corona Update) डोकं वर काढलं आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव (Mumbai Covid-19) दिवसागणिक वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क (BMC) झाली असून उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत चौथी लाट येणार तर नाही ना? अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच आहे. मुंबईतील दैनंदिन कोविड रुग्णसंख्या 700 पार पोहोचली आहे. मुंबईतील गोरेगाव भागांत रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. सध्या गोरेगावमधील रुग्णसंख्या वाढीचा दर 0.086 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 3735 सक्रीय रुग्ण आहेत. राज्याच्या 60 टक्के सक्रीय रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. ठाणे 658, रायगड 108 आणि पुण्यात 409 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत काल (शुक्रवारी) 763 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर काल दिवसभरात 352 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1576 दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय, ठाणे मनपा 77, नवी मुंबई 71, पुणे मनपा 72 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका 'अॅक्शन मोड'मध्ये
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होणार असल्याने इतर आजारांची शक्यता पाहता, आरोग्य यंत्रणेसह सर्वच खात्यांनी सुसज्ज राहावं, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. याशिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधितांचा शोध घेता यावा यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Dr. Iqbal Singh Chahal) यांनी दिल्या आहेत.
मुंबईत सध्या दररोज आठ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. ही संख्या आता 30 ते 40 हजारापर्यंत वाढविणं आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचं प्रमाण आठ टक्क्यांपर्यंत पोहोचलं असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल आणि कोरोना संसर्गाला रोखता येईल. याबरोबरच सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)