एक्स्प्लोर

Mumbai Coronavirus Case: मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण दुप्पट होण्याचा दर 477 दिवसांवर

Mumbai Corona Cases : राज्यभरात कोरोना उतरणीला लागला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत देखील कोरोना रुग्णांचे दैनंदिन येणारे आकडे कमी होताना दिसत आहेत. आजही मुंबईतील कोरोनाचा आकडा एक हजारच्या खाली आला आहे. 

Mumbai Corona Cases : राज्यभरात कोरोना उतरणीला लागला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत देखील कोरोना रुग्णांचे दैनंदिन येणारे आकडे कमी होताना दिसत आहेत. आजही मुंबईतील कोरोनाचा आकडा एक हजारच्या खाली आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.  

पुणे शहरात आज 384 नवीन रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज 384 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 858 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 4 लाख 70 हजार 311 झाली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 509 झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजारांच्या खाली असून शहरात 5 हजार 518 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी पुण्यात 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 97 टक्के झाला आहे. तर पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा काल 6.44 टक्के इतका नोंदला आहे. पुणे मनपा हद्दीतील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून उद्याही हे लसीकरण होणार आहे. उद्या विद्यार्थ्यांसाठी 300 डोस उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

राज्यात आज 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात आज एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
आज राज्यातील 12 शहर (महापालिका क्षेत्र) आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार नाही. चंद्रपूर शहर, भंडारा जिल्हा, बुलडाणा, अमरावती शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे शहर, मीरा भायंदर, भिवंडी, ठाणे शहर या ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार करण्यात आलेली नाही. तर पनवेल शहर, मालेगाव शहर, जळगाव शहर, औरंगाबाद जिल्हा, लातूर शहर, अकोला शहर, वाशिम जिल्हा, नागपूर शहर, नागपूर जिल्हा, चंद्रपूर शहर या ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीत केलेली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget