Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 1724 रुग्णांची वाढ, 1240 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1724 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1724 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 1240 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 52 हजार 201 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 575 झाली आहे. सध्या मुंबईत 11 हजार 813 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 1724 रुग्णांमध्ये 1649 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 458 दिवसांवर गेला आहे.
राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात 2956 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1724 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 14, 2022
14th June, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1724
Discharged Pts. (24 hrs) - 1240
Total Recovered Pts. - 10,52,201
Overall Recovery Rate - 97%
Total Active Pts. - 11813
Doubling Rate - 458 Days
Growth Rate (7th June- 13th June)- 0.149%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 11813 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 3403 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 1246 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 483, रायगड 642, रत्नागिरी 27, सिंधुदुर्ग 30, सातारा 16, सांगली 16, सोलापूर 16, नाशिक 99, अहमदनगर 42, जळगाव 12, औरंगाबाद 17, लातूर 32, नांदेड 11, अकोला 20, वाशिम 17, बुलढाणा 11, नागपूर 234, गडचिरोली 13 आणि चंद्रपूरमध्ये 17 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 18267 सक्रिय रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या