Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी 695 रुग्णांची नोंद, 1504 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 695 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 695 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 91 हजार 607 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 620 झाली आहे. सध्या मुंबईत 5,600 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 695 रुग्णांमध्ये 655 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 836 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 6, 2022
6th July, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 695
Discharged Pts. (24 hrs) - 1504
Total Recovered Pts. - 10,91,607
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 5600
Doubling Rate - 836 Days
Growth Rate (29th June- 5th July)- 0.080%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5600 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 5750 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 3384 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 509, रायगड 952, रत्नागिरी 103, सिंधुदुर्ग 59, सातारा 190, सांगली 86, कोल्हापूर 91, सोलापूर 242, नाशिक 382, अहमदनगर 198, जळगाव 97, धुळे 74, औरंगाबाद 259, जालना 143, बीड 32, लातूर 90, नांदेड 35, उस्मानाबाद 131, अमरावती 62, अकोला 108, वाशिम 282, बुलढाणा 169, यवतमाळ 59, नागपूर 615, वर्धा 40, भंडारा 79, गोंदिया 16, गडचिरोली 28 आणि चंद्रपूरमध्ये 57 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 19981 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 3142 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3974 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 5600 सक्रिय रुग्ण आहेत.
संबंधित बातम्या