Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 580 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 454 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,17,521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 40 हजार 911 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली
Maharashtra Corona Update : राज्यात आज 3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 58 जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4676 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1195 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 53 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन एक आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 25, 2021
25th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/ABPnQ4Fanx
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज 3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 276 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 60 हजार 735 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के आहे. राज्यात आज 58 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
राज्यात आज 3,723 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 416 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (06), नंदूरबार (3), धुळे (1), जालना (30), परभणी (67), हिंगोली (18), नांदेड (6), अमरावती (97), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (15), यवतमाळ (05), नागपूर (142), वर्धा (5), भंडारा (4), गोंदिया (7), चंद्रपूर (77), गडचिरोली (18 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. राज्यात सध्या 37 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,59,120 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,483 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.























