Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी 290 रुग्णांची नोंद, 382 कोरोनामुक्त
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 290 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 290 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 382 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,00,198 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 635 झाली आहे. सध्या मुंबईत 2,003 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 290 रुग्णांमध्ये 273 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2621 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2022
20th July, 6:00 pm
Positive Pts. (24 hrs) - 290
Discharged Pts. (24 hrs) - 382
Total Recovered Pts. - 11,00,198
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 2003
Doubling Rate - 2321 Days
Growth Rate (13th July - 19th July)- 0.027%#NaToCorona
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2003 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 5305 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1055 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 180, रायगड 392, रत्नागिरी 48, सिंधुदुर्ग 54, सातारा 221, सांगली 171, कोल्हापूर 140, सोलापूर 288, नाशिक 610, अहमदनगर 460, जळगाव 75, धुळे 102, औरंगाबाद 306, जालना 203, बीड 61, लातूर 151, नांदेड 59, उस्मानाबाद 189, अमरावती 103, अकोला 103, वाशिम 254, बुलढाणा 225, यवतमाळ 55, नागपूर 1297, वर्धा 73, भंडारा 176, गडचिरोली 31 आणि चंद्रपूरमध्ये 100 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 14636 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 2325 रुग्णांची नोंद
राज्यात आज 2325 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2471 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहे.
संबंधित बातम्या