एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर, 1430 सक्रिय रुग्ण

Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 218 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी सतरा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 158 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 1430 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,42,280 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 3914 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.017% टक्के इतका आहे. 

सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत

राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1430 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 284 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 195 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 34 आणि पालघरमध्ये 20 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2039 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 276 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33, 452 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज एकूण 2039 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1675 रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Coronavirus Update : राज्यात मंगळवारी सक्रिय रुग्ण दोन हजारापार तर 338 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Mumbai Corona Update : सोमवारी मुंबईत 150 नव्या रुग्णांची भर, 1370 सक्रिय रुग्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget