Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 100 नव्या रुग्णांची भर, 637 सक्रीय रुग्ण
Mumbai Corona Update : बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 100 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 100 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळावारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 637 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,39,870 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 8079 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.008 टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 3, 2022
3rd May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 100
Discharged Pts. (24 hrs) -102
Total Recovered Pts. - 10,39,870
Overall Recovery Rate - 98%
Total Active Pts. - 637
Doubling Rate -8079 Days
Growth Rate (26th April- 2nd May)- 0.008%#NaToCorona
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 637 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 210 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 92 सक्रीय रुग्ण आहेत. नाशिक 12, अहमदनगर 18, रायगड 14 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1016 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 182 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 182 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे. राज्यात सध्या 1027 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 170 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संबंधित बातम्या