एक्स्प्लोर

coronavirus | महापौरांची मुंबईत गस्त; कुठे कडक शब्दात सुनावत तर कुठे हात जोडून विनंती करत मास्क लावण्याचं आवाहन

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईत गस्त घातली. यावेळी मास्क न लावणाऱ्यांना कडक शब्दात सुनावत तर हात जोडून विनंती करत नियमांचं पालन करण्यास सांगितलं.

मुंबई : 'ए बाळा, मास्क लाव ना रे, शो ला ठेवलास का?' 'ओ दादा मास्क लावा, नाहीतर फाईन भरावा लागेल.' 'जर तुमच्यासारखे वकीलच असे वागत असतील तर कसं चालेल?' या सूचना आहेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा ते सीएसएमटी प्रवास करुन स्टेशनची पाहणी केली. लोकल ट्रेन तसंच प्लॅटफॉर्मवर जे लोक मास्क न घालता फिरताना दिसले त्यांना महापौरांनी कडक कारवाईचा इशारा दिला. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महापौरांनी आज भायखळा ते सीएसएमटी असा प्रवास केला. यावेळी त्यांनी सगळ्यांना कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. तसंच गरज पडेल तिथे अनेकांना कडक शब्दात सुनावत कारवाईचा इशाराही दिला. तर काहींना हात जोडून मास्क घालण्याची विनंती केली.

या कारवाईदरम्यान किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "महापौर हे पदच लोकांसाठी आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. मास्क नसेल तर दिला पाहिजे. मुंबईकरांनी आतापर्यंत चांगली साथ दिली, यापुढेही देतील. जे काही दहा टक्के लोक आहेत, जे वेगवेगळे प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करत आहेत, त्यांना उत्तर देणं गरजेचं नाही. आपण कामातून उत्तर देऊ. आता वाढणारा कोरोना रोखायचा असेल तर मास्क वापरणं गरजेचं आहे आणि तो नाकावर असणं अनिवार्य आहे."

10 टक्के बेजबाबदार लोक 90 लोकांना अडचणीत आणत आहेत : महापौर या कारवाईदरम्यान काय पाहायला मिळालं याविषयी सांगताना महापौर म्हणाल्या की, "30 ते 40 जणांमधील 30 जणांनी व्यवस्थित मास्क लावला होता. दहामध्ये चार तरुण मुलं होती. उरलेले वयोवृद्ध होते, त्यांनी मास्क लावला नव्हता. त्यांना मास्क खरेदी करण्यासाठी आमच्या खिशातून पैसे दिले. हे दहा टक्के बेजबाबदार लोक 90 लोकांना अडचणीत आणत आहेत. पण त्यांनी असं करु नये."

मला घरात राहून चालणार नाही : किशोरी पेडणेकर लोकांना वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. अडाणी लोक मास्क लावत आहेत पण सुशिक्षित लोक मास्क लावताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री काम करत आहेत. महापौर म्हणून लोकांमध्ये जाऊन मला काम करायला हवं. कोविड 19 वाढत असताना मला घरात राहून चालणार नाही. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार दोन्ही मिळून काम करत आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget