Mumbai Corona Cases : मुंबईकरांना दिलासा; कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक
Mumbai corona cases : राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये 2,218 सक्रिय रुग्ण आहेत.
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 316 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,25,109 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,714 झाली आहे. सध्या मुंबईत 2,218 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 316 रुग्णांमध्ये 299 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2249 दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 7, 2022
7th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/3Skib0CaAX
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2218 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1624 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1534 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 157, रायगड 283, रत्नागिरी 78, सिंधुदुर्ग 30, सातारा 43, सांगली 45, कोल्हापूर 79, सोलापूर 33, नाशिक 192, अहमदनगर 109, धुळे 12, औरंगाबाद 23, जालना 18, लातूर 44, नांदेड 14, उस्मानाबाद 33, अमरावती 19, अकोला 19, वाशिम 18, बुलढाणा 23, नागपूर 136, वर्धा 15, भंडारा 17, गोंदिया 10, गडचिरोली 33 आणि चंद्रपूरमध्ये 147 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 7,043 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 1,094 कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज 1,094 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1,747 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
संबंधित बातम्या