एक्स्प्लोर

Mumbai Corona Cases : मुंबईत आज 529 कोरोनाबाधितांची नोंद तर 725 डिस्चार्ज, ठाण्यात एकही मृत्यू नाही

Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार ठाणे जिल्हा आणि ठाणे मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही.

Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,84,107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 672 दिवसांवर गेला आहे. आज आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार ठाणे जिल्हा आणि ठाणे मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही. ठाणे शहरात आज 71 तर जिल्ह्यात 72 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

Maharashtra Corona Cases : मोठा दिलासा...! राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, आज 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज

मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण (Dharavi) धारावी झोपडपट्टी या भागात पाहायला मिळाल्यामुळं हा परिसर कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला.धडकी भरेल अशीच कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. पण, पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोविड योद्ध्यांच्या योगदानानं आणि अर्थातच नागरिकांच्या सहकार्यानं धारावीनं कोरोनाशी लढा दिला आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच अंशी हा लढा यशस्वीही ठरला.सोमवारी (14 जून) आलेल्या नव्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये लक्षवेधी प्रमाणात कमी झाली आहेत.  मागील 24 तासांत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या परिसरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणं ही एक मोठी दिलासादायक बातमीच आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. 

राज्यात एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात आज 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,732 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात आज एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आजपर्यंत एकूण 56,54,003 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.55 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 200 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,82,15,492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,17,121 (15.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,49,251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,997 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

28 जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही 

सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 28 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्हा, ठाणे शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, पालघर, वसई विरार शहर, मालेगाव शहर, अहमदनगर शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव शहर, पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर शहर, जालना जिल्हा, परभणी शहर, लातूर शहर, लातूर जिल्हा, नांदेड शहर, अमरावती शहर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद आजच्या सरकारी आकडेवारीत नाही.  . 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget