Milind Deora : मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडणार, राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार? प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
Mumbai Congress : महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्या वाट्याला जाणार असल्याने मिलिंद देवरा यांनी आपल्या राजकीय भवितव्याची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.
![Milind Deora : मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडणार, राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार? प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण mumbai congress milind deora meet ncp praful patel ajit pawar lok sabha election 2024 news update Milind Deora : मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडणार, राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार? प्रफुल्ल पटेलांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/15/b416cef91a1897b891f43e7ebbc63b1a169736633922593_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: काँग्रेसचे (Mumbai Congress) बडे नेते आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar) जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची यासंबंधित दोन वेळा भेट झाल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईतून खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते माजी खासदारही आहेत. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी सुरूवातीला लोकसभेची निवडणूक होणार असून त्या दृष्टीने त्यांनी पुन्हा एकदा चाचपणी सुरू केली आहे. मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल यांची दोन वेळा भेट झाल्याची माहिती आहे. अजित पवार गट हा दक्षिण मुंबईची जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत जाणार का अशी चर्चादेखील केली जात आहे.
महाविकास आघाडीमुळे ही जागा शिवसेनेच्या वाट्याला
राज्यात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढणार आहेत. आमदार किंवा खासदार ज्या पक्षाच्या त्या ठिकाणचा उमेदवार त्या पक्षाचा हा सरळ फॉर्म्युला महाविकास आघाडी राबवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा ही काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना न मिळता ती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मिळणार हे नक्की आहे.
भाजप दावा सोडणार का? (South Mumbai Election)
त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याची चाचपणी करण्यासाठी मिलिंद देवरा यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईमध्ये गुजराती समूदायाची आणि उद्योगविश्वाशी निगडीत लोकांची संख्या जास्त असल्याने या जागेवर आधीच भाजपने दावा सांगितला आहे. अजित पवार गटाने या जागेची मागणी जरी केली असली तरी भाजप त्याला कितपत साथ देणार हे पाहावं लागेल.
कोण आहेत मिलिंद देवरा? (Who Is Milind Deora)
मिलिंद देवरा हे दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. 2004 आणि 2009 साली ते दक्षिण मुंबईतून निवडून आले होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते. मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळचे नेते आहेत. पण काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या पक्षापासून दूर असल्याची चर्चा आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)