(Source: Poll of Polls)
Mumbai Crime: "एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोट करू"; मुंबई विमानतळाच्या मेलआयडीवर धमकीचा ईमेल
Mumbai Crime: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आणि एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली.
Mumbai Crime News: मुंबई पोलिसांचं (Mumbai Police) टेन्शन पुन्हा वाढलं आहे. पुन्हा एक धमकीचा ईमेल (Threatening Email) आला आहे. पण यावेळी ईमेल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये (Mumbai Police Control Room) नाहीतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एका ईमेलवर आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल 2 (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Terminal 2) बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा हा ईमेल होता.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आणि एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली. सूत्रांनी सांगितलं की, हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी केली आहे, तेही बिटकॉइनमध्ये. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे.
धमकीचा ईमेल आल्यानंतर तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ईमेल पाठवला होता.
आरोपीनं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुमच्या विमानतळासाठी हा अंतिम इशारा आहे. असं न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, अन्यथा आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले जातील आणि 24 तासांनंतर दुसरा इशारा दिला जाईल.
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकावणं आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 385, 505(1) (बी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आयपी अॅड्रेसचा वापर करून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता, त्याचा शोध घेण्यात आला आहे. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलीस आता प्रयत्न करत आहेत.