एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या फादरला कठोर जन्मठेपेची शिक्षा

विशेष पॉक्सो कोर्टानं बुधवारी फादर जॉन्सन लॉरेन्स याला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश सीमा जाधव यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

Mumbai Latest Updates :  एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात मुंबईतील एका ख्रिस्ती धर्मगुरूला दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टानं बुधवारी फादर जॉन्सन लॉरेन्स याला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश सीमा जाधव यांनी आरोपीला पॉक्सो कायद्यातील कलम 6 आणि 12 अंतर्गत दोषी घोषित करत ही शिक्षा सुनावली आहे. डिससेंबर 2015 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी या 52 वर्षीय पाद्रीला अटक केली होती, तेव्हापासून तो तुरूंगातच आहे.

काय घडली होती घटना -

पीडित मुलगा हा ऑगस्ट 2015 मध्ये चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी जात होता. त्यादरम्यान आरोपी फादरनं त्याला अनेकदा सर्वजण गेल्यानंतर एकट्याला थांबवलं होतं. पीडित मुलगा हा गरीब कुटुंबातून होता, चर्चमधून मिळणाऱ्या मदतीवर परिणाम होईल या भितीनं त्यानं घडत असलेल्या अत्याचाराची कुणालाही लगेच माहिती दिली नाही. मात्र हळूहळू त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊ लागला. तो एकटा एकटा आणि शांत राहू लागला, पुढे त्याची तब्येतही नाजूक राहू लागली आणि त्याला रूग्णालयात दाखल करावं लागलं. 

नोव्हेंबर 27 रोजी मुलगा आपल्या कुटुंबासोबत पुन्हा चर्चमध्ये गेला. त्यावेळी आरोपी फादरनं त्याला एक बॉक्स आपल्या ऑफिसमध्ये जाऊन ठेवण्यास सांगितलं आणि पाठोपाठ तोही तिथं गेला. त्या रात्री पुन्हा त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. घरी गेल्यावर मात्र त्या मुलानं आपल्या आईला घडलेली हकीकत सांगितली आणि त्यानंतर आईवडिलांनी याची पोलिसांत तक्रार दिली.

आरोपी फादर जॉन्सन लॉरेन्सनं आपल्यावरील सर्व आरोप कोर्टात फेटाळून लावले होते. मात्र सरकारी पक्षानं कोर्टात मुलाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरसह नऊ अन्य साक्षीदार आणि अन्य पुरावे सादर करत फादरवरील आरोप सिद्ध केले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्वपूर्ण निकाल! 'स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच', नागपूर खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्द

अल्पवयीन मुलीशी संगनमताने ठेवलेले शारीरिक संबंध POCSO अंतर्गत गुन्हा नाही; कोलकाता हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget