एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी मोदींना पंतप्रधान बनवणे महत्त्वाचे, आवश्यकतेप्रमाणे त्याग करा; देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश

Devendra Fadanvis Speech : विरोधकांच्या इंडिया आघाडीत एकही राष्ट्रीय नेता नाही, त्यांचे अंतर्गत मतभेद आहेत, मोदी विरोध हा एकच अजेंडा आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुंबई: येत्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हा आपला संकल्प आहे, मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपसाठी नाही भारतासाठी महत्वाचे आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं. भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे त्याग करावा लागेल असंही ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा संदेश दिला. 

अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मोदीजी करत आहे. मिशन 2024 हे भाजप पेक्षा भारतासाठी महत्वाचे आहे. आपण नेहमी सांगतो की देशाकरता त्याग करण्याची क्षमता असलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. लोकशाहीच्या मार्गाने देशाला परमोच्च शिखरावर नेण्यासाठी आपण लढाई दिली पाहिजे. यासाठी जो त्याग आहे तो आपण निश्चित करू शकतो. मोदीजी पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचे आहे

मागील 9 वर्षात भारत बदलला आहे, भारतात गरिबीतून लोक वर आले हे युनायटेड राष्ट्राने सांगितले असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ज्या भारतातला कुपोषितांचा देश म्हटलं जातं होत, त्याचे परिवर्तन 9 वर्षात झाले. भारताने प्रगतीचा वेग वाढवला आहे. माझ्या पुढच्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था विस्तारून दाखवीन असे मोदीजी म्हणाले. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. मोदीजींचे खंबीर नेतृत्व यामुळे हे संभव झालं आहे. जगाच्या पाठीवर जे देश आहेत ते भारताच्या पाठीमागे येताना दिसत आहेत. 

जगाच्या पाठीवर आपले पंतप्रधान बॉस 

आज जी 20 च्या माध्यमातून आपले पंतप्रधान पुढे चालत होते आणि बलाढ्य देशाचं लोक मागून चालत होते असे फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आपल्या बाजूच्या देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. श्रीलंका, बांगलादेश या सर्व देशाना आपली मदत घ्यावी लागते. जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधान यांना बॉस म्हटलं जाते. मोदींजीनी जो भारत तयार केला त्याशिवाय आता कुणाचे चालणार नाही. म्हणून आपल्या पाठीशी सर्व उभे आहे. काही शक्ती यामुळे घाबरल्या आहेत. ही वाटचाल कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातील काही जण त्याला बळी पडत आहेत.

इंडिया आघाडीमध्ये एकही राष्ट्रीय नेता नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांची इंडिया आघाडी आपल्याला लढा देऊ शकत नाही, लोक ज्यावेळी मोदींजीचा विचार करतात त्यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हे पक्के आहे. इंडिया आघाडीत आपआपसात वाद आहे. आता पासून यांची स्थिती अशी आहे की हे एकत्र राहू शकत नाही. यांच्यातील एकही राष्ट्रीय नेता नाही. 



महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget