(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BEST Electricity tariff: मुंबईकरांना 'शॉक' बसणार? बेस्टकडून MERC कडे 18 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव
Mumbai Electricity Increase : काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता.
Mumbai Electricity Bill Increase : महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना लवकरच आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. बेस्टने (BEST) 18 टक्के वीजदर वाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे एप्रिलपासून मुंबईकरांच्या वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) वीज दरवाढीचा प्रस्ताव (Mumbai Electricity Bill Increase) पाठवण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये भर म्हणून आता बेस्टनेही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महागाईची (Mumbai Electricity Increase) झळ आणखी सोसावी लागण्याची चिन्हे आहेत. बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळारा आहे. या वीज ग्राहकांसाठी बेस्टने 6 टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा प्रस्ताव स्विकारल्यास मुंबईकरांना महागाईचा झटका बसणार आहे. एकीकडे महागाईच्या झळा सर्वसामान्य माणूस सोसत असताना आता वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुंबई शहरात बेस्ट आणि टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. तर, मुंबई उपनगरात अदानी पॉवर, टाटा पॉवर आणि काही भागांमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. महावितरणकडून भांडुप, मुलुंड या भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. वीज दरवाढीबाबत आता प्रस्ताव सादर झाल्यानंतर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीनंतर वीज नियामक आयोगाकडून अंतिम दरवाढ जाहीर करण्यात येईल.
किती युनिटसाठी किती वीज दरवाढ?
आर्थिक वर्ष 2023 ते 24 साठी बेस्टने एमईआरसीकडे (महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग) वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. 18 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये 18 % पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी 100 युनिट पर्यंत 18 % पर्यंत दरवाढीचा प्रस्ताव बेस्टकडून ठेवला आहे. तर 101 ते 300 युनिट पर्यंत 6% पर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर 301 ते 500 युनिट व त्यापुढे सुद्धा दोन टक्के पर्यंत वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या बेस्टचा वीज दर काय?
0 ते 100 युनिट
सध्याचे दर -
2 रुपये 93 पैसे
101 ते 300 युनिट
सध्याचे दर -
5 रुपये 18 पैसे
301 ते 500 युनिट
सध्याचे दर
7 रुपये 79 पैसे -
501 ते 1000 युनिट
सध्याचे दर -
9 रुपये 2 पैसे -