एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या भाषणाच्या आधीपासूनच मशिदींच्या भोंग्याचा आवाज कमी; मुंबई अमन समितीचा दावा

राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि मशिदीच्या भोंग्याच्या आवाजाच्या कमी पातळीचा कोणताही संबंध नसल्याची माहिती मुंबई अमन समितीने दिली आहे. 

मुंबई: गुढी पाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुंबईतील मशिदींरच्या भोंग्यांचे आवाज कमी झाल्याचं सांगितलं जातंय. पण आवाजाची ही पातळी राज ठाकरेंच्या भाषणाच्या आधीपासूनच कमी करण्यात आली असून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मशिदीच्या आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे पालन करण्यात येत असल्याची माहिती मुंबई अमन समितीचे अध्यक्ष फरीद शेख यांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा आणि मशिदीच्या भोंग्याच्या आवाजाच्या कमी पातळीचा कोणताही संबंध नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

अजानसाठी मुंबईतील मशिदीतील लाऊडस्पीकरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आधीपासूनच करण्यात येत असल्याचं फरीद शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींच्या भोंग्यासंबंधी वक्तव्य केलं होतं.

फरीद शेख आणि मुस्लिम प्रतिनिधींनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गुरुवारी भेट घेतली. या बैठकीत विविध मशिदींचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि विशेष शाखेचे डीसीपी उपस्थित होते.

भांडुप सोनापूर परिसरातील एका मशिदीला ध्वनिप्रदूषणासंबंधी नोटीस देण्यात आली होती.  शेख यांनी सांगितले. त्यानंतर या मुस्लिम प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पवित्र रमजान महिना शांततेत साजरा झाला पाहिजे त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका या प्रतिनिधींनी घेतली. पोलीस आयुक्तांनी प्रत्येक क्षेत्रातील मुस्लिम नेत्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तयार केला आहे.

मुंबई पोलिसांनी मशिदीवरील लाऊडस्पीकर डेसिबल पातळीपेक्षा कमी ठेवण्यास आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले. शहरातील अनेक भागांमध्ये या भोग्यांचा आवाज आधीच डेसिबलच्या पातळीपासून खाली आला होता.

महत्वाच्या बातम्या: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी सोडणाऱ्या आनंद परांजपेंना उपाध्यक्ष करू नका, सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, विश्वसनीय सूत्रांची माहिती
A2MM Indradhanu Festival : अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Raj Thackeray and Veer Savarkar: सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या
सावरकरांची प्रतिमा वापरुन महाराष्ट्रात तेढ पसरवण्याचा प्रयत्न, उदोउदो करणाऱ्यांनी... राज ठाकरेंच्या कानपिचक्या

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
Embed widget